22 Feb 2011

मी अजूनही जगतोय...

मी अजूनही जगतोय...

आला दिवस ढकलतोय,
मी अजूनही जगतोय...

हरवलंय काहीतरी,
कधीचं ते शोधतोय...
मी अजूनही जगतोय...

कुठेतरी चुकलोय,
चुका त्या निस्तरतोय...
मी अजूनही जगतोय...

मी बरोबर, की जग,
स्वतःशीच भांडतोय...
मी अजूनही जगतोय...

काय करू, काय नको
आतल्या आत कुढतोय...
मी अजूनही जगतोय...

सगळा विसरायचं,
दर आठवणीला ठरवतोय...
मी अजूनही जगतोय...

मनातल्या मनात रडतोय,
पण प्रत्येक आसू थांबवतोय...
मी अजूनही जगतोय...

मी खुश आहे,
सगळ्यांना भासवतोय...
मी अजूनही जगतोय...

आला दिवस ढकलतोय,
मी अजूनही जगतोय...
                              - राहुल मुळे

1 comment: