मैत्री!!!
तेच सगळे, तोच मी,
बदललीयेत,
ती फक्त गणिते...
तेच प्रश्न, तीच कोडी,
बदललीयेत,
ती फक्त उत्तरे...
तेच संदर्भ, तीच स्पष्टीकरणे,
बदललीयेत,
ती फक्त कारणे...
तेच दिवस, त्याच आठवणी,
बदलल्यात,
त्या फक्त रात्री...
तेच मित्र, त्याच मैत्रिणी,
बदललीये,
ती फक्त...
मैत्री!!!
- राहुल मुळे.
ती फक्त...
मैत्री!!!
- राहुल मुळे.
No comments:
Post a Comment