1 Mar 2011

Funny Quotes...



"जेंव्हा एक तरुणी एका तरुणाच्या हृदयावर डोके ठेवते;
...तेव्हा मला फ़ार गंमत वाटते .
त्याला हृदय नसतं;
आणि
तिला डोके नसतं....."
 - मार्क ट्वेन

22 Feb 2011

मैत्री!!!

मैत्री!!!

तेच सगळे, तोच मी,
बदललीयेत,
ती फक्त गणिते...

तेच प्रश्न, तीच कोडी,
बदललीयेत,
ती फक्त उत्तरे...

तेच संदर्भ, तीच स्पष्टीकरणे,
बदललीयेत,
ती फक्त कारणे...

तेच दिवस, त्याच आठवणी,
बदलल्यात,
त्या फक्त रात्री...

तेच मित्र, त्याच मैत्रिणी,
बदललीये,
ती फक्त...
मैत्री!!!
                           - राहुल मुळे.

मी अजूनही जगतोय...

मी अजूनही जगतोय...

आला दिवस ढकलतोय,
मी अजूनही जगतोय...

हरवलंय काहीतरी,
कधीचं ते शोधतोय...
मी अजूनही जगतोय...

कुठेतरी चुकलोय,
चुका त्या निस्तरतोय...
मी अजूनही जगतोय...

मी बरोबर, की जग,
स्वतःशीच भांडतोय...
मी अजूनही जगतोय...

काय करू, काय नको
आतल्या आत कुढतोय...
मी अजूनही जगतोय...

सगळा विसरायचं,
दर आठवणीला ठरवतोय...
मी अजूनही जगतोय...

मनातल्या मनात रडतोय,
पण प्रत्येक आसू थांबवतोय...
मी अजूनही जगतोय...

मी खुश आहे,
सगळ्यांना भासवतोय...
मी अजूनही जगतोय...

आला दिवस ढकलतोय,
मी अजूनही जगतोय...
                              - राहुल मुळे