प्रस्तावना: बरेच दिवस झाले हि कविता लिहून ठेवली होती पण वर टाकायला जमतच नव्हतं... कधी कधी आपल्याला कुतूहल वाटतं की आपण असे वागलो की समोरच्याला काय वाटेल... जग आपल्याबद्दल काय विचार करेल... ते समोरच्याला विचारण्यापेक्षा जर स्वतःलाच अनुभव घेता आला तर....
कधीतरी... स्वतःलाच जगताना बघायचं
मी कसा वागतो, त्रयस्थ बनून पहायचय,
माझा सगळ्यांना चिडवणं, त्रास देणं, मला पण एकदा अनुभवायचंय
कधीतरी... स्वतःलाच जगताना बघायचं
कधीतरी स्वतःला स्वतःवरच चिडताना बघायचंय
आणि मग स्वतःच केलेला गैरसमज स्वतःच दूर करायचाय...
कधीतरी... स्वतःलाच जगताना बघायचं
कधीतरी माझ्या छंदाचं मलाच कौतुक करायचंय
आणि स्वतःच केलेल्या स्तुतीनी स्वतःच हुरळून जायचंय...
कधीतरी... स्वतःलाच जगताना बघायचं
कधीतरी स्वतःचाच उपदेश घ्यायचाय
आणि स्वतःच्या चुका स्वतःच निस्तरायच्याय
कधीतरी... स्वतःलाच जगताना बघायचं
पण हे सगळं मला त्रयस्थ म्हणून करायचंय...
कारण, मी स्वतः, त्रयस्थ नसताना, स्वतःच्या चुका पूर्णतः दूर्लक्षितोय
म्हणूनच, कधीतरी...
स्वतःलाच जगताना बघायचं...
- राहुल मुळे
No comments:
Post a Comment