आई
कुठे गेलीस तू
मी एकटा राही...
कशास गेलीस तू
मला ठाव नाही....
तुजवीण जगताना
जगण्यास अर्थ नाही...
राती रोज निजताना
तुझी कूस नाही...
आठवण तुझी येताना
अश्रुस बंध नाही...
नेत्र रोज मिटताना
मूर्ती तुझीच पाही...
असा मोठा होताना
ममता तुझीच नाही...
आयुष्य हे कंठताना
आशिष दे ग आई!!!.
Wa wwa !
ReplyDeleteThanks PK
ReplyDeleteCan I please know your full name? I'm not able to recognize you from your initials...