प्रस्तावना: एकदा आमच्या Deccan Hikersच्या group id वर एक mail आला
आणि त्यामध्ये 2-2 ओळींची कविता होती. त्या mailला कुणीतरी reply ही तसाच
केला आणि मग सगळेच एकदम पेटून उठले ;-)
त्यावेळीच लिहिलेल्या या 2-2 ओळी...
(खूप जणांनी खूप काही लिहिलेलं, त्यापैकी या फक्त माझ्या ओळी आहेत... )
त्यावेळीच लिहिलेल्या या 2-2 ओळी...
(खूप जणांनी खूप काही लिहिलेलं, त्यापैकी या फक्त माझ्या ओळी आहेत... )
मी आणि तू!!!
मी वेडा तू शहाणी
मी सत्य तू कहाणी!!
तू खिडकी मी रस्ता
तू smile मी हालत पस्ता!!
तू मैत्रीण मी मित्र
तू email मी पत्र!!
मी propose तू चप्पल
तू बालिश मी टक्कल!!
तू नकार मी होकार
तू किमती मी टुकार!!
तू सुरुवात मी अंत
तू हास्य मी खंत!!
मी बाटली तू बुच
मी मी आणि तू तूच!!!
-राहुल मुळे.