12 Aug 2011

उगाच...

उगाच...
उगाच मी एकटा फिरतो
उगाच मी आकाश बघतो
उगाच मी तारे मोजतो
आणि उगाच स्वतःशीच गुजतो...

उगाच मी गालात हसतो
उगाच मी स्मित लपवतो
उगाच मी जगा समजावतो
आणि उगाच मी स्वतःवर चिडतो...

उगाच मी वाद घालतो
उगाच मी रागे भरतो
उगाच मी रडवा होतो
आणि उगाच मग स्वतःस समजावतो...

उगाच मी आठवणीत रमतो
उगाच मी कवीता करतो
उगाच मी गाणेही गुणगुणतो
आणि उगाच...  फक्त तुलाच स्मरतो...
                                  - राहुल मुळे.

28 Jun 2011

माझं मन

माझं मन

सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही...
कितीही वाटलं तरी करवत नाही...
कुणी काही सांगितल तर एकवत नाही...
अश्रु कितीही गाळले तरी गळतच नाही...
माझं मन हे असं का? कुणालाच कळत नाही...

चटके कितीही बसले तरी ओरडत नाही...
आपल्यानीच तोडल तरी दुरावायला तयार नाही...
अपेक्षेप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणता येत नाही...
माझं मन हे असं का? कुणालाच उमजत नाही...

निस्वार्थी कष्टाची जाणीवही कुणा नाही...
निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही कुणा नाही...
कितिही केलं तरी केलं कुणी म्हणतच नाही...
वाटतं मी कुणाचा  कुणी राहिलोच नाही...
कारण कुणी मला प्रेमाने आपलं म्हणतच नाही...
माझं मन हे असं का? कुणालाच समजत नाही...

This is not my poem, I got it as forward, but loved it....

4 Jun 2011

आई

आई

कुठे गेलीस तू
मी एकटा राही...
कशास गेलीस तू
मला ठाव नाही....

तुजवीण जगताना
जगण्यास अर्थ नाही...
राती रोज निजताना
तुझी कूस नाही...

आठवण तुझी येताना
अश्रुस बंध नाही...
नेत्र रोज मिटताना
मूर्ती तुझीच पाही...

असा मोठा होताना
ममता तुझीच नाही...
आयुष्य हे कंठताना
आशिष दे ग आई!!!.