25 May 2011

स्मरणशक्ती???

अफाट होती तुझी स्मरणशक्ती


अफाट होती तुझी स्मरणशक्ती
तुला नेमके ठाऊक होते, एकमेकाना पहिल्यांदा पाहीले
तेव्हा सुर्याचा पृथ्वीशी असलेला नेमका कोन
एकमेकांच्या नजरेत हरवताना 
आपण नक्की किती होतो एक का दोन?


तुला ठाऊक होते माझ्या कुठल्या शर्टला होती किती बटणे ?
कुठल्याचा उसवला होता खिसा?
रात्रभर गाणी म्हणून दाखवताना
नेमका कितव्या गाण्याला बसला होता घसा


तुझ्याशी बोलताना चुकून जांभई निसटली
त्या दिवसाची तारीख, महिना, वर्ष, वेळ
आणी एकूण किती मायक्रो सेकन्द टिकू शकला होता
मुश्किलीने एकमेकांशी अबोला धरण्याचा खेळ


आठवतेका तुला रातराणी शेजारी बसून
कविता म्हणून दाखवताना
फुललेल्या एकूण कळ्यांची संख्या
माझ्या अक्षराची पुस्तकात लिहीलेली मानसशास्त्रीय व्याख्या


नेमके आठवत होते तुला
कवितानी बोट टिकवले होते ते नेमके कुठल्या क्षणांवर
आणी मनावरील पानावर कोरल्या गेल्यावरही
कुठली कविता कुठल्या पानावर


अफाट होती तुझी स्मरणशक्ती
मलाच कसेकाय विसरलीस कुणास ठाऊक?


                                                 - संदीप खरे

24 May 2011

Once I fell sick...


I had written this long back, was just going through the files and found it. I don't remember why I had not posted it here then... but anyways better late than never... ;) hehehe

So it goes like...

Once I fell sick, thoda bukhar-shukhar aa gaya tha. So I was sleeping at home “peacefully”. One of my good friends called me... “bhai kaisa hai? Aaj office nahi aaya tabiyat to thik hai naa?” Mai bola, “nahi yaar abhi bukhar hai, so hi raha tha.” “Bhai tu aaram kar bhai, I’ll call later.” Okay. cut. He is so considerate, thanks to him ;).
I slept; just after 10 mins another friend calls... “kya hua be? Aaya kyon nahi? Aaj party jaane waale the sab, pura chaupat kar diya tune.” “I am not feeling well man, bukhar aa gaya yaar...” “abe bola tha tereko jyada mat pi, par humari sunta kaun hai...” And he was only cursing me not even a min before for ruining his so called “Party”; he is a true friend lolz. “Chal thik hai soja party baad mein karenge...” lekin karenge jaroor, Lolz...
Another 10 more mins... galat... nobody called, but meri hi nind ud gayi... galat kaam kiya un logone mujhe jaga ke hahaha. Meine Socha abhi uth hi gaya hoon to kyon naa thoda masti ho jaye. By the way I am famous (Or maybe Infamous) in the office for my PJs. (not sure if famous is the correct word I can use. you can ask that to my colleagues.)
Yaa! So where was I? Someone shouts “tu masti kar raha tha”... galat be, I was still in my bed only and was just thinking of doing masti. Hmm to masti yeh ki I sent a SMS to one of my friends... “Are I'm having fever; 102; So due to high temp my brain got expanded and now I have a super brain. So please be careful... I can crack great PJs now...” I actually had that much fever that time, but I know usko vishwas nahi hua hoga L . The reaction you can imagine only... she became careful and just replied “bye, tc, will call later!” hahahahaha, I still had not given up... I messaged  “Ya sure. I know you are just being careful. Good. You should be ha ha. I'll sleep now. Brain jyada expand ho gaya to scientist log ka locha ho jayega. bye tc” in reply she shouted in such a loud voice that I could hear it at my home all the way from my office... and my mobile service provider sent me an sms with what she shouted... my name... something like “Rahulllllllllllllllllllllllllllll”... couldn’t count the “l”s in that. I am still wondering, was she Sceptical or overwhelmed! (God knows what that means hahaha). After some time my other friend called and goes like “are achchha hua tu nahi aaya, Aaj “******” shouted and all the glasses shattered... we are leaving now for home... ” (Sorry can’t tell the name though).
Thanks for reading this, hope you enjoyed. Please feel free to comment. (All the bad comments will be deleted humbly.)
(All the characters mentioned above real and so are the incidences... Please don't ask the names, just keep guessing...)

17 May 2011

Love Letter...

Hi Dear!!!!!!
कशी आहेसकाय चालु आहे सध्याअभ्यास कसा चालंलायनीट अभ्यास कर! सहा महिन्यांनी M.B.A. ची परीक्षा असेल नाआणि मग जॉब पण चांगला मिळायला हवा! बाकी काय चाललय नविनमुंबईला कधी येते आहेसकळव मग फोन करुन.

Actually, 
सुरुवात काय करावी हे कळत नव्हंत म्हणुन ही वरची सगळी प्रस्तावना. असं हे पत्र मधेच आणि 'विनाकारणलिहायला २ कारणं आहेत. म्हंटलं फोन पेक्षा पत्र लिहिण एकदम मजेदार होईल. शिवाय या दोन-तीन दिवसात कॉलेजची बरीच आठवण येते आहे.
आज संध्याकाळी ऑफिस मधुन परत आलो आणि सोसायटीचे मेन-गेट उघडणार तोच पारीजाताचा सुगंध आला. पहिल्यांदा तुझीच आठवण आली. आठवतं?तुला फुलं आवडतात म्हणुन एके दिवशी तुझ्या ओंजळीत भरपुर पारीजाताची फुलं ठेवली होती. केव्हढी खुश झाली होतीस तुखांदे उडवुन चार-चारदा मलाThanx म्हणत होतीस. त्यानंतर बराचवेळ आपण कट्ट्यावर बसुन होतोतेव्हाही फुले ओंजळीत घेऊन बसली होतीस. म्हंटल "अगं टाक पिशवीत!" तर म्हणलीस "नको! कोमेजुन जातील!"
किती मजा केली ना आपण कॉलेज मध्येकॉलेजची शेवटची २ वर्षे तर आपल्या ग्रुपने मनापासुन एन्जॉय केली. कॉलेज इव्हेंटमध्ये आपल्या ग्रुपनेच खरी'जानआणली होती. कॉलेजमध्ये मी सगळे उद्योग केले फक्त आपल्याला Dance काहि जमला नाहि. कॉलेज इव्हेंटच्या शेवटच्या दिवशी सगळं कॉलेज नाचत होतं. आपला ग्रुप अर्थात स्टेज वर जाउन धमाल करत होता. तु सुध्दा तीन-तीनदा मला 'अरे ये!म्हणुन बोलावलसहीपण साले आपले पायच उचलत नाहित ना. गणपती विसर्जनाच्या दिवशी चौपाटीकडच्या रस्त्यावर आम्ही 'जे काहिकरतो त्यालाच आम्ही नाच म्हणतो. आता तसा नाच इथे कसा करणार?
आणि हो! कॉलेज मध्ये मारामारी सुध्दा केली. त्या माकडाने तुला मुद्दामहुन धक्का मारला होता म्हणुन कसा वाजवला होता त्याला त्यावेळीपण तू उगाच मधे पडलीसनाहितर त्याच्या गुढघ्याच्या वाट्या त्याला भीक मागण्यासाठी काढुन देणार होतो.
मात्र त्या नंतर अर्ध्या तासात सगळं कॉलेज आपलं "काहितरी" आहे असं कुजबुजत होतं. सगळ्यांना तेव्हा सांगुन थकलो कि बाबांनो खरंच तसं काहि नाहिये! काय लोकं असतातमैत्रीचं नात त्यांना पटतच नाहि.
अरे हो! आता मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा किस्सा! खंरतर पत्र लिहायचं दुसरं कारण. - कालच दुपारी चहा पिण्यासाठी आईने हाक मारली. मला चहा देऊन शेजारच्या खुर्चीवर भाजी निवडत होती. मधेच आईने तुझ्या बद्दल विचारलं - 
आई:काय करते रे ती सध्या?मी:M.B.A.आई:आहे कुठे मग सध्या ती?मी:पुण्याला सिंबॉयसिस मध्ये.
आई:अच्छा तरीच म्हंटलं बरेच दिवस आली नाहि!(मला चहाचा चटका लागला यावेळी) उंची किती आहे रे तीचीकाहि अंदाज?(मला हसु फुटलं)
मी:आई! अगं असं पुस्तकाचं मधलं पान सुटल्या सारखे का प्रश्न विचारते आहेसतिच्या घरी न येण्याचा आणि तिच्या उंचीचा काय संबध?आई:वेड पांघरुन पेड गावला जाऊ नकोस! तुला चांगलच कळतय मी का विचारते आहे ते!(मला उगीच 'अपघाती वळणअशी पाटी दिसलीआणि मी परत मान हलवुन हसलो! तर आई उखडलीच!). दात काढायला काय झालंकाहि चुकलं का माझं ते सांग!
मी:अगं आई! मी अजुन २५चाच आहेकाय घाई आहेबघु २-३ वर्षांनी. आणि तिच्याबाबत म्हणशील तर आमचं तस काहि नाहिये!
(
पण त्या भाजीच्या देठा बरोबरचतीने माझे मुद्दे सुध्दा खुडुन काढले)
आई:अरे मग काय म्हातारा झालास कि मग लग्न करणार आहेस काअश्शी निघुन जातील २ वर्षं. तुला चांगली ३०-३५ हजाराची नोकरी आहे. सगळं व्यवस्थित आहे. आणि हो! ती सुद्धा तुझ्याच वयाची नाफार-फार तर चार-सहा महिने इकडे तिकडे. तिचे आई-वडिल तिच्यासाठी मुलगा बघायला देखिल लागले असतील! अरे २५ म्हंटजे मुलीसाठी खुपच झालं!
(
मी विषय बदलायचा म्हणुन घड्याळाकडे बघुन म्हणालो -)
मी:अगं ती सिरीयल नाहि बघायची का तुला?आई:विषय बदलु नकोस! मला उत्तर दे!
(
मला कळ्लंआई दुपारची सिरीअल चुकवतेय म्हणजे ती जरा जास्तच सिरीअस आहे!)
मीआ‍ऽऽऽऽऽई! अगं का माझ्या आणि तिच्या मागे लागली आहेस?आईआई काय आईमुलगी चांगली आहे! सुंदर आहे! चांगले संस्कार आहेतशिवाय म्हणशील तर आपल्याच जातीतील आहे. सांग ना काय वाईट आहे?(तीने तुला इव्हेंटमध्ये नाचताना बघितलं नव्हतं म्हणुन हे सगळं म्हणत होती!! ही!ही!just kidding!)मी:मातामाय(आई अशी चिवित्र वागायला लागली की कि मी "मातामाय! ल्येकराचं काय बी चुकलं-माकलं असेल तर पोटात घे! येत्या आवसेला गावच्या वेशीवर कोंबड उतरविन!!!!" या चालित सुरवात करतो)अगं खरच आमचं तस काहि नाहिये! काहितरी डोक्यात घेऊ नकोस!
आई:हं! मला नको सांगुस! आई आहे मी तुझी! अरे मांजराने डोळे मिटुन दुध प्यायलं तरी बाकीचे बघत असतात(मी त्या चहात बुडवलेल्या बिस्कीटा सारखा मऊ झालो होतो!)
मी:तुला कशा वरुन वाटंल असंतु कितीवेळा भेटली आहेस तिला८वेऽऽळा १० वेळाआणि माझ्या वाढदिवसानंतर कुठे आलिये तीत्यालाहि ६-७ महिने झाले!तेव्हा सुट्टित आली होती ती!)
(
पण ऐकेल ती आई कसली?)आई:हांऽऽऽ!!! तेव्हांचच म्हणतेय मी! ती स्वत:हुन आत येउन मला मदत करत होती. आज काय मेनुकसा करायचातुला अजुन काय काय आवडंतसगळं विचारत होती!! बाकीच्या तिघीबाहेर बसल्या होत्या नुसत्या खिदळत नी दात काढत!
(
तिला सांगुन काहिच फायदा नव्हताचटकन चहा संपवला आणि उठलोतर म्हणाली - )
आई:अरेतुमचं लग्न झालंतुम्हाला मुलं-बाळं झाली की आम्ही सुटलो!!!(आईने आता "Body-line" बॉलिंग करायला सुरुवात केली होती!) नाहितरी आम्हा म्हातारा-म्हातारीला दुसरा काय उद्योग आहे?मी:म्हंटजे?? तुम्हाला काहितरी काम मिळावं म्हणुन आम्ही लग्न करायचं?? या हिशोबाने तर भारतातील बेकारी केव्हाच संपायला हवी होती!!(आणि परत मोठ्ठ्ठ्याने हसलो)
आई:हं! कराऽऽ!थट्टा करा! पण सांगुन ठेवत्येयपुढल्या वर्षभरात तुझं लग्न झालचं पाहिजे! तिच्याशी झालं तर आनंदच आहे! नहितर दुसरी बघु!!(मी चटकनt-Shirt बदलुन घरा बाहेर निघालो.
तसा रात्री जेवायलाच उगवलो. आत पाणी पिण्यासाठी गेलोतर मला बघुन आईने जोरात भांडे आपटले. त्या दिवशी अनेक भांड्यांवर बरेच 'कोचेआले होते. हॉल मध्ये आलो तर बाबांनी विचारलं - "काय रेकाय झालयंदुपारपासुन असेच आवाज येत आहेतआणि आज T.V. चक्क बंद आहे!" मी म्हणलो "माहित नाहि बुआ! भाजीवाल्याशी हुज्जत घालुन आली असेल!!" बाबांनाहि ते खरं वाटलं असावं त्यांनी परत पेपर मध्य तोंड खुपसलं.
रात्री जेवताना सुद्धा पोळीभाजीभातआमटीलोणचं या शब्दांमागचे प्रश्नचिन्ह कोणते आणि उद्गारचिन्ह कोणते हे ओळखुन हो-नाहि म्हणावे लागत होते. शक्यतो नाहिच म्हणत होतोनाहितर म्हणायची - "तू जेवताना लग्नाला हो म्हणलास!" म्हणुन.
कश्श्या असतात ना या "आया". मुला-मुलीत फक्त मैत्री होऊ शकते यावर विश्वासच नसतो यांचा. असोपुढले ७-८ दिवस तरी जेवताना 'नाहिम्हणणेच योग्य राहिल असं दिसतय. या आयांचं काहि खरं नाहि.
हे सगळं मी तुला मोकळेपणाने सांगु शकतो कारण तु हे समजुन घेऊ शकतेस. आणि तसं तुलाहि हे नविन नाहि.
बरतर हे सोडुन बाकी सगळं उत्तम. सध्या 'गधा-मझदुरीकरतोय. ऑफिसमध्येच रात्री ११:०० वाजतात. गेल्या २ आठवड्यात आज पहिल्यांदा ९-९:१५ ला घरी आलोय(आणि तेहि चक्क सोमवारी). म्हंटलं झोपण्या आधी पत्र लिहुया - फोन पेक्षा जास्त चांगलं!
असोतु इथे कधी येते आहेसपुढच्या महिन्यात वाढदिवस आहे तुझातेव्हा जमणार आहे काआणि हो तब्येतीची काळजी घे. उगीच अबर-चबर खाउ नकोसआणि आपल्याला जागरणं झेपत नाहित हे जग जाहिर आहे, so please जागरण करुन अभ्यास करु नका.

तुझा,बुद्धुराम उर्फ जोकर.


ता.क. - आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस. वागते ती अशी कधी कधी!



------------------------------------------------------------------------------------------------------

आणि या पत्राला तिचं उत्तर तरी काय मिळावं...

------------------------------------------------------------------------------------------------------




Hiiiiiiii!!! !!!
खुप बरं वाटलं तुझ पत्र बघुन. बरं झालं पत्र लिहिलस ते. इथे सगळंच इंग्लिशमध्ये वाचांव लागतं-बोलावं लागतं. जाम कंटाळा आलाय! खुप दिवसांनी असं मराठी वाचतेयत्यातहि तुझं पत्र मिळालं म्हणुन बरं वाटलं.
माझा अभ्यास चालु आहे. सध्या प्रोजेक्ट चालु आहे. त्या गडबडितुन वेळ काढुन तुला उत्तर पाठवते आहे.
खरचं कित्ती धमाल केली आपण कॉलेज मध्येग्रॅजुएट होऊन बाहेर पडलो तर कोणालाच माहित नव्हतं कोण कुठे जाणारकाय करणारआता प्रत्येक जण कुठेतरी जॉब करतोय किंवा शिकतोय. तुला चांगली नोकरी लागलीमी M.B.A. करतेय. सगळे कसे पांगलो ना आठहि दिशांनातरी एकमेकांच्या contactमध्ये असतो आपण.
कित्ती आठवणी आहेत कॉलेजच्या. बरं झालं तुच आठवण करुन दिलीस. तु दिलेली ती ओंजळभर पारीजाताची फुलं आजही आठवतात मला. खरच खुप आनंद झाला होता मला तेव्हा. आपण कट्ट्यावर जाऊन बसलो होतो. आपण खुप tension मध्ये किंवा खुप आनंदात असलो कि तिथे न बोलतच बसुन रहायचो तसे! बराच वेळ बसलो होतो. मी खुष झाले म्हणुन तू आनंदात होतास आणि मी माझ्या सर्वात आवडत्या गोष्टी माझ्याजवळ होत्या म्हणुन खुष होतेती पारीजाताची नाजुक फुल आणि...........'तू'. होयतु मला आवडतोस. त्या दिवशी सुद्धा त्या फुलांना हुंगत असताना अनावधानानं तुझ्या खांद्यावर डोकं टेकवलं,तुला वाटलं मी नेहमीप्रमाणे अल्लड्पणा करतेय. मग मी स्वत:ला आवरलं तुझ्यापासुन थोडी दुर सरकुन बसले. त्यावेळी ३-४ फुल खाली पडलीअजुन पडु नयेत म्हणुन मी अलगद ओंजळ मिटली. तु म्हणालास "अगं टाक पिशवीत!" मी म्हणाले "नको! कोमेजतील!" पण मी परत ओंजळ उघडलीखरचं ती फुलं कोमेजली होती. पण ते तुला समजलचं नाहि.
त्या दिवशी कॉलेज इव्हेंटमध्ये मी तुला नाचायला बोलावलं वाटलं तु येशीलजमेल तसा नाचशीलकिमान..२ स्टेप नाचशील माझ्या बरोबर. पण तु तिथेच उभा राहिलासतुझा एक बुट मात्र ठेका धरुन हलत होता हे मी पाहिलं. पण त्या गर्दित "दोघांनीच" नाचण्याची मजा आणी कारण तुला समजलचं नाहि.
आणि हो! माझी छेड काढणार्‍याला तु मारत होतासमारत कसला 'तुडवतहोतास. तेव्हा मी मध्ये पडलेमुद्दामच. कारण तु त्याचे हात-पाय तोडणार हे समजत होतंच पण मला तुझी काळजी वाटत होती. तुला काहि झालं असतं तरम्हणुन मी तुला सोडवुन दुर घेउन गेले. त्या गडबडित मलाहि तुझे २-४ फटके लागले,पण तुला ते कळलच नाहि. आणि खरंच अर्ध्या तासात सगळ्या कॉलेजमध्ये पसरलं की आपलं 'काहितरीआहे. तू सगळ्यांना रागाने-लोभाने तसं काहिहि नाहि हे समजावत होतासमी मात्र गप्पच होते. पण माझ्या गप्प बसण्याचे कारण तुला समजलेच नाहि.
अरे होकॉलेज इव्हेंटमध्ये नाचताना माझा पाय मुरगळला होताआठवतयं तुलातुच घरी सोडायला आला होतास. वाटलं कॉलेज तसं जवळच आहे माझा हात धरुन चालत नेशील पण तु टॅक्सी बोलावलीस. एरवी हे टॅक्सीवाले दुरचं भाडं सांगितलं तरी येत नाहित आणी तो मेला 'एका चाकावरतयार झाला. आत बसवुन तु मला क्रिकेट खेळताना पाय मुरगळला की काय करतोस ते सांगत होतास! माझी अश्श्शी चिड-चिड झाली होती. शेवटी मला रडु फुटलंतुला वाटलं माझा पाय दुखतोय म्हणुन मी रडतेय. मला म्हणालास "खुप दुखतयं कापाय टेकवत नाहिये काचल नाहितर घरी जाण्या आधी डॉक्टरकडे जाउन x-ray काढायचा का?" या - या तुझ्या या अश्या प्रश्नांनी माझं रडणं वाढलं. वाटलं की तुझेच ८-१० x-ray काढावेत आणि तुला हृदय नावाची गोष्ट आहे की नाहि ते बघावं. पण माझ्या रडण्याचं कारण तुला समजलच नाहि.
एके दिवशी बाबांना हॉस्पिटलमध्ये Admit केलं. त्यांच्या छातीत दुखतं होतं म्हणुन. तुला कॉल केल्यावर धावत आलास. डॉक्टरनी ज्या गोळ्या-औषधे सांगितली होती ती लगेच आणुन दिलीस. दादासुध्दा २ तासांनी आला त्यानंतर. तु आलास तसा खुप धीर वाटला. तु आलास म्हणुन किमान मी माझं रडु दाबुन ठेवु शकले. दुसर्‍या बाजुला आईला धीर देत होते. दोन दिवसातच बाबांना डिस्चार्ज मिळाला. त्याच संध्याकाळी आपण भेटलो. तु विचारलस - "बाबांना बरं वाटतय ना आता?" यावर मी तुला मीठी मारुन रडले होतेकारण बाबांना बरं वाट्लं या बरोबर 'तूत्यावेळी 'माझ्यासाठीतिथे होतास या कारणामुळे. ते आनंदाश्रु होतेचपण तुझ्यावरचा विश्वास आणि प्रेम देखिल होते. तुला वाटलं मी 'बाबांना काहि झालं असतं तर?' या कारणासाठी रडतेय. तु नंतर उगीच मला समजवत राहिलासकारण माझ्या रडण्याचं कारण तुला समजलच नाहि.
असेच एकदा आपण रस्त्याने जात होतो. पावसाळा होतादोघेही छत्री विसरलो होतो. आणि आलाच...पाऊस आलाच. तू चटकन समोरच्या झाडाच्या आडोश्याला गेलास. मी मात्र भिजत राहिले. मला तु म्हणालास "इथे ये!" पण मीच तुला पावसात भिजायला बोलवत होते. मला वाट्त होतं कि तु असचं पुढे यावसआणि त्या कोसळणार्‍या पावसात मला अलगद मीठित घ्यावस. आणि..... तु जवळ आलासहिमाझा हात घट्ट्ट्ट पकडलास. उगीच माझे श्वास दुणावले. पण तु मला जवळपास फरपटत त्या झाडाखाली नेलं आणि वर वस्सकन माझ्यावर ओरडलास - "ताप येऊन आडवी होशील ना!". पाऊसहि पुढल्या क्षणी थांबला. कदाचित तोही हिरमुसला असावा. मला तुझा इतका राग आला होता कि नकळत डोळ्यातुन २ थेंब गालांवर ओघळले. तुला वाटलं ते पावसाचं पाणी असावं. आपण परत चालायला सुरुवात केली. माझं घर येई पर्यंत तू मला अगम्य भाषेत काहितरी सांगत होतास. कदाचित कुठल्यातरी देशाचा इतिहास किंवा तसचं काहितरी. माझं लक्षच नव्हतं तिथे. उभ्या आयुष्यात तो एकच प्रसंग असावा जेव्हा तु अखंड बोलत होतास आणि मी मात्र पूर्णवेळ गप्प होते. पण तुला ते काहे समजलच नाहि.
तुला आवडतात म्हणुन मी स्वत: घाट घालुन मागे एकदा 'तळणीचे मोदककरुन आणले होते. डबा उघडल्यावर तु आनंदाने ओरडलास "आयला!!!पॅटिस?"माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण तुझी आयुष्य रेषा मोठी होती म्हणुन चव घेउन म्हणालास "ओह! सॉरी! मोदक आहेत!! अरे वा!! छान झालेत!" दुसराहि मोदक उचलुन म्हणालस - "तुझ्या आईने केले वाटतं! काकुंच्या हाताला चवच छान आहे!!" त्यावर मी फक्त हसले. पण माझ्या हसण्याचे कारणच तुला समजले नाहि.
तु एकदा क्रिकेट खेळत होतास. मी पण ग्राउंड बाहेर उभे होते 'तुलाबघत. अचानक catch पकडायला धावलास आणि अडखळुन पडलास. दोन्ही कोपरं आणि गुढघे सोलवटुन निघाले होते. उजव्या कोपराचं तर भजच झालं होतं. मी धावत येउन माझा रुमाल त्या जखमेवर दाबुन धरला. रक्त थांबल्यावर म्हणालास "अरे-अरे! तुझा रुमाल उगीच खराब झाला.!" पण तो रुमाल आजहि आहे माझ्याकडे. काते तुला कदाचित समजणार नाहि.
६ महिन्यांपूर्वी तुझ्या वाढदिवसाला घरी आले होते. तुला gift म्हणुन मी छोटासा ताजमहाल दिला. म्हणालास "छान आहे! पण इतका खर्च कशाला केलास?"मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. मी तशीच स्वयंपाकघरात गेले आणि तुझ्या आईला मदत करायला लागले. तुला काय आवडतंकाय आवडत नाहि हे वळसे घालुन घालुन विचारत होते. पण हो!!! तुझ्या आईला मात्र ते लगेच समजलं.
आता please इतके वाचुन "म्हणजे काय?" असे विचारु नकोस. मला तु आवडतोस. त्या घरात सुन म्हणुन यायला मला आवडेल. तुझा निर्णय काय ते सांग. आणि हो! घाई करु नकोस. पुढच्या महिन्यात माझ्या वाढदिवसाला मी तिथे येते आहे २ दिवस. तेव्हा सांग. अजुन १५-२० दिवस आहेत.
हे पत्र मुद्दाम तुझ्या ऑफिसच्या पत्त्यावर पाठवते आहे. म्हणजे थेट तुझ्याकडे येईल. घरी कोणाच्या हातात पडावं हे मला नकोय. का ते तरी समज!

'
फक्त तुझीच'रडुबाई.
ता.क. - मी नेहमी म्हणते तसा तु खरचं बुध्दुराम आहेस. वर लिहायला विसरले होते!!!