17 Nov 2011

मी तुझा नी तू माझी!!!

मी तुझा नी तू माझी!!!

मी तुझा नी तू माझी,
दुधात विरघळते साखर जशी!!
मी तुझा नी तू माझी,
पहाटेचं पडलेलं स्वप्नं उशाशी !!

मी तुझा नी तू माझी,
जसा खेळतो भवरा फुलाशी!!
मी तुझा नी तू माझी,
मी उन्हात अन तू जणू सावलीशी!!

मी तुझा नी तू माझी,
पाहिली मनी स्वप्ने जराशी!!
मी तुझा नी तू माझी,
का तू माझ्या मनासवे खेळशी!!

मी तुझा नी तू माझी,
पाहता तुला भरे धडकी उराशी!!
मी तुझा नी तू माझी,
लाजू नको आता ये जवळ अशी...
                                                    - राहुल मुळे

2 Nov 2011

मन मोकळं कर!!!

प्रस्तावना :
          कधी कधी  आपल्या मनात खूप काही असतं, आपण खूप विचार करत बसतो, झोपही लागत नाही... अशावेळी, आपल्याला कोणीतरी हवं असतं... बोलायला... फक्त बोलायला...
आई, वडील, भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण, girlfriend, boyfriend, नवरा, बायको कुणीतरी... आपलसं...
आणि जेव्हा आपण सगळं बोलून टाकतो तेव्हा आपल्याला एकदम हलकं हलकं वाटतं...
          काल मी असाच माझ्या एका मैत्रिणीशी chat करत होतो, ती पार वैतागलेली आणि officeचं tension घेऊन बसलेली, तेव्हा तिच्याशी बोलता बोलताच ही कविता सुचली... (मैत्रिणीचं नाव मुद्दामच नाही लिहीलं आहे, उगाच मार कोण खाईल ;) हाहाहाहा)


मन मोकळं कर!!!

बोलतो आपण जेव्हा, 
हितगुज मनसोक्त कर...
हातचं राखुन न ठेवता,
मन नक्की मोकळं कर...

विचारातले क्लेश काढून,
दुजाभाव दूर कर...
देता देता शिव्या,
मन नक्की मोकळं कर...

भेट शक्य नसल्यास,
फोनला जवळ कर...
उगाच कॉल करताना,
मन नक्की मोकळं कर...

मनात होता चलबिचल,
कुणालातरी आपलसं कर...  
आत्ता कर नाही तर नंतर कर,
पण मन मात्र नक्की मोकळं कर...
                                                  - राहुल मुळे.

17 Oct 2011

खूप दिवस झाले...

खूप दिवस झाले...


खूप दिवस झाले 
कविताच सुचत नाहीये
स्मरतोय फक्त तुला
बाकी काहीच उमगत नाहीये

   खूप दिवस झाले 
फोटोही काढला नाहीये
डोळ्यासमोर फक्त तूच
बाकी काहीच दिसत नाहीये

खूप दिवस झाले
झोपलोही नीट नाहीये
उघड्या-बंद डोळ्यात तूच
बाकी काहीच सुधरत नाहीये

 खूप दिवस झाले
कामही नीटसे नाहीये
डोक्यात फक्त तूच
बाकी काहीच समजत नाहीये

खूप दिवस झाले
कुणाशीही बोललो नाहीये
शब्दात नावारूपे तूच
बाकी काहीच उच्चारवत नाहीये

खूप दिवस झाले
मला खरच काहीच सुचत नाहीये!!!
                                           राहुल मुळे...