27 Sept 2011

आजकाल मी वेड्यागत वागतो!!!

आजकाल मी वेड्यागत वागतो!!!

एकटा बडबडतो,
एकटा गुणगुणतो,
एकटा रडतो
नी एकटाच हसतो...
आजकाल मी वेड्यागत वागतो!!!

एकटा पडतो,
एकटा उठतो,
एकटा धडपडतो,
नी एकटाच सावरतो...
आजकाल मी वेड्यागत वागतो!!!

एकटा चालतो,
एकटा पळतो,
एकटा फिरतो
नी एकटाच थांबतो...
आजकाल मी वेड्यागत वागतो!!!

एकटा आठवणीत रमतो,
एकटाच तुला स्मरतो,
नि मग कधीच एकटा नसतो
आजकाल मी वेड्यागत वागतो!!!
                                              - राहुल मुळे

2 Sept 2011

मला वाटतं...

मला वाटतं...

मला वाटतं...
माझ्या स्वप्नात यावीस फक्त तू
आणि तुझ्या मी...

मला वाटतं...
मी जगावं फक्त तुझ्यासाठी
आणि तू माझ्यासाठी...

मला वाटतं...
तू असावीस फक्त माझी
आणि मी तुझा...

मला वाटतं...
माझ्या ओठी असावं फक्त तुझंच नाव
आणि तुझ्या ओठी माझं...

मला वाटतं...
माझ्या हाती असावा फक्त तुझाच हात
आणि तुझ्या हाती माझा...

मला वाटतं...
की तुलापण असाच वाटावं
पण मला फक्त वाटतं...
                                 - राहुल मुळे.

12 Aug 2011

उगाच...

उगाच...
उगाच मी एकटा फिरतो
उगाच मी आकाश बघतो
उगाच मी तारे मोजतो
आणि उगाच स्वतःशीच गुजतो...

उगाच मी गालात हसतो
उगाच मी स्मित लपवतो
उगाच मी जगा समजावतो
आणि उगाच मी स्वतःवर चिडतो...

उगाच मी वाद घालतो
उगाच मी रागे भरतो
उगाच मी रडवा होतो
आणि उगाच मग स्वतःस समजावतो...

उगाच मी आठवणीत रमतो
उगाच मी कवीता करतो
उगाच मी गाणेही गुणगुणतो
आणि उगाच...  फक्त तुलाच स्मरतो...
                                  - राहुल मुळे.