8 Feb 2011

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

जुगलबंदी चालू होती दोघांची..
आता वेळ कमी तेव्हा पैसे कमी..
आनंदी आता आहे का तेव्हा होतो ?
आठवता आठवता दुखी होतो....

तेव्हा रोड साइड जीन्स वापरायचो...मित्रांच्या
आता CK, Diesel धूळ खात पडल्या आहेत माझ्या...

तेव्हा सामोसा दिसला की भूक शमायची....
आता पिझ्झा बर्गरने सुद्धा ती नाही लागायची..

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

तेव्हा पैसे जमवून पेट्रोल भरायचो..
लांब लांब फिरायला जायचो...
आता tank फुल्ल असूनही...
मित्रांना मुकलो....

टपरी वरचा चहा CCD मधल्या cofee मधे बदलला,
पण हा फरक मनाला नाही पटला..

Pre-Paid Card वरुन बोलायची तेव्हा मजा यायची...
आता postpaid असूनही बोलायला नाही कुणी..

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

दिवस बदलले ... General class मधून Business Class झाला.
पण फिरायला आता वेळ नाही उरला...

तेव्हा Second hand का होईना Desktop असावा असे .वाटत..
आजकाल Branded Laptop असूनही चालू करावा नाही वाटत...

खरी मैत्री Proffesional friends मधे बदलली
पण त्या...मैत्रीची सर नाही आली....

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

I miss those days and all those friends....

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी...

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी...


लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढया जगात माय मानतो मराठी...


आमुच्या मनामनात दंगते मराठी

आमुच्या रगारगात रंगते मराठी

आमुच्या उराउरात स्पंदते मराठी

आमुच्या नसानसात नाचते मराठी...


आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी

आमुच्या लहानग्यात रांगते मराठी

आमुच्या मुलामुलींत खेळते मराठी

आमुच्या घराघरात वाढते मराठी...


आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशांत दाटते मराठी

येथल्या नगानगात गर्जते मराठी...


येथल्या दरीदरीत हिंडते मराठी

येथल्या वनावनात गुंजते मराठी

येथल्या तरुलतात साजते मराठी

येथल्या कळीकळीत लाजते मराठी...


येथल्या नभामधून वर्षते मराठी

येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी

येथल्या चराचरात राहते मराठी...


कवी:

सुरेश भट


संगीतकार:

कौशल श्री. इनामदार


गायक:

रविंद्र साठे, अश्विनी भिडे-देशपांडे, सुरेश वाडकरआशा खाडिलकर, अशोक पत्की, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, हरिहरन, आरती अंकलीकर-टिकेकर, सत्यशील देशपांडे, श्रीधर फडके, साधना सरगम, शौनक अभिषेकी, संजीव चिम्मलगी, ओंकार दादरकर, सावनी शेंडे-साठये, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, अवधूत गुप्ते, प्रसाद ओक, शैलेश दातार, सुनील बर्वे, सुमीत रागह्वन, सीमा देशमुख, मधुराणी गोखले-प्रभुलकर, स्वानंद किरकिरे, विठ्ठल उमप, देवकी पंडित, उत्तरा केळकर, रंजना जोगळेकर, शरद जांभेकर, रवींद्र बिजूर, महेश मुतालिक, अनिरुद्ध जोशी, सलील कुलकर्णी, माधुरी करमरकर, अनघा पेंडसे, मृदुला दाढे- जोशी, मधव भागवत, सुचित्रा भागवत, वर्षा भावे, भाग्यश्री मुळे, संगीता चितळे, अनुजा वर्तक, अनघा ढोमसे, आनंदी जोशी, सायली ओक, मधुरा कुंभार, महालक्ष्मी अय्यर, मिलिंद इंगळे, अशोक हांडे, अच्युत ठाकूर, उदेश उमप, नंदेश उमप, आदेश उमप, संदेश औअप, कौशल श्री इनामदार, वैशाली सामंत, अजय-अतुल, शंकर महादेवन, हम्सिका अय्यर, निहिरा जोशी, अजित परब, ऋषिकेश कामेरकर, अमोल बावडेकर, योगिता पाठक, अमृता नातू, विभावरी आपटे-जोशी, मधुरा दातार, संजीवनी भेलांडे, मिलिंद जोशी, मनीषा जोशी, निलेश मोहरीर, योगिता चितळे, कल्याणी पांडे-सालुंके, राजा काळे, राम देशपांडे, जितेंद्र अभ्यंकर, हृषिकेश रानडे, मंदार आपटे, आनंद सावंत, अभिजित राणे, नेहा राजपाल, शिल्पा पै, जान्हवी प्रभू-अरोरा, सोनाली कर्णिक, स्वप्नजा लेले, मयुरेश पै, मिथिलेश पाटणकर, विनय राजवाडे, मनोज देसाई, प्रशांत काळुंद्रेकर, त्यागराज खाडीलकर, संदीप उबाळे, अमृता काळे, उमेश जोशी, केतन गोडबोले, मंगेश चव्हाण, निलेश मुळ्ये, मयुरेश मडगांवकर, आलाप भागवत, श्रीरंग भावे, रसिका जोगळेकर, अनन्या भौमिक, सायली महाडिक, सुचित्रा इनामदार, केतकी भावे, आदिती कुलकर्णी, प्रगती जोशी, अश्विनी परांजपे, श्रुती भावे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, आर्या अंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत.


एक कहानी...

एक कहानी...

एक कहानी अधुरी,
बनते बनते बिगड़ती...


कभी ठंडी छाव,
और कभी धुप तपती...
कभी रिमझिम सावन,
और कभी बिजली कड़कती...


एक कहानी अधुरी,
बनते बनते बिगड़ती...


कभी फूलोंसी नाजुक,
कभी कांटोंसी चुभती...
कभी पूनम की चाँदनी,
तो कभी रात अमावस की...


एक कहानी अधुरी,
बनते बनते बिगड़ती...


कभी बाते मीठी मीठी,
और कभी गालियाँ है देती...
कभी candle light dinner,
तो कभी अकेले ही एक रुखी रोटी...


एक कहानी अधुरी,
बनते बनते बिगड़ती...


एक कहानी... अपनी सी लगती,
देखो दुनिया तो, हर जगह दिखती...
सपने सुहाने दिखाती,
और तरीके जीनेके सिखाती...


एक कहानी अधुरी...
जिंदगी पूरी बनाती...
                          - राहुल मुळे