खूप दिवस झाले...
खूप दिवस झाले
कविताच सुचत नाहीये
स्मरतोय फक्त तुला
बाकी काहीच उमगत नाहीये
खूप दिवस झाले
फोटोही काढला नाहीये
डोळ्यासमोर फक्त तूच
बाकी काहीच दिसत नाहीये
खूप दिवस झाले
झोपलोही नीट नाहीये
उघड्या-बंद डोळ्यात तूच
बाकी काहीच सुधरत नाहीये
खूप दिवस झाले
कामही नीटसे नाहीये
डोक्यात फक्त तूच
बाकी काहीच समजत नाहीये
खूप दिवस झाले
कुणाशीही बोललो नाहीये
शब्दात नावारूपे तूच
बाकी काहीच उच्चारवत नाहीये
खूप दिवस झाले
मला खरच काहीच सुचत नाहीये!!!
राहुल मुळे...