विरहाचे दु:ख!!!
विसरूनी सारे पुन्हा
मांडीन डाव नवा...
मीच ठरवीन आता
मी कुणाला हवा!
उगाच स्मरताना तुला
मनी प्रश्नांचा थवा...
का छळतात आठवणी
जाब मला हा हवा!
ओघळत्या अश्रूंस माझ्या
नकोच खांदा नवा...
नकोच कुणी सोबतीला
मी एकटाच हवा!
भावनांशी खेळणे तुझे
विसरेन का मी केव्हा...
आयुष्य हे माझे
संपवेन मी जेव्हा!
- राहुल मुळे